Ad will apear here
Next
इनामदार महाविद्यालयातर्फे आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषद
पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातर्फे ‘व्हिजन इंडिया २०३०’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले असून, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने यांच्या हस्ते १८ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० वाजता या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

प्राचार्य आणि वाणिज्य परिषद अध्यक्ष डॉ. शैला बूटवाला आणि वाणिज्य परिषद सचिव डॉ. एम. जी. मुल्ला यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ‘एमसीई’ सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत. आझम कॅंपसमधील असेम्ब्ली हॉल येथे ही परिषद होणार आहे. केंद्रीय विद्यापीठ आयोगाचे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन हे परिषदेच्या समारोप कार्य्रक्रमाला १९ जानेवारीला सकाळी १० वाजता उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेला आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहा विद्यापीठांतून १२० तज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक उपस्थित राहणार असून, ६५ शोधनिबंध सादर केले जाणार आहेत.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/RZPHBW
Similar Posts
अल्पसंख्याक समाजातील गुणवंतांचा सत्कार पुणे : राज्यभरातील मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, जैन, पारशी, सीख या अल्पसंख्याक समाजातील दहावी परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंतांचा सत्कार अवामी महाज या सामाजिक संस्थेतर्फे तसेच हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.
‘एमसीई’तर्फे पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीतर्फे २१ नोव्हेंबर रोजी ईद-ए-मिलाद, पैगंबर जयंतीनिमित्त अभिवादन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे. या अभिवादन मिरवणुकीचे हे १४ वे वर्ष आहे.
‘अँग्लो उर्दू’च्या ४० विद्यार्थ्यांचे ‘जेईई’ परीक्षेत यश पुणे : महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटिन एज्युकेशन (एमसीई) सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉइज हायस्कूल (आझम कॅंपस, कॅम्प पुणे) या कनिष्ठ महाविद्यालयातील ४० विद्यार्थ्यांनी ‘जेईई’ परीक्षेत यश मिळविले आहे.
‘महिलांच्या अभिव्यक्तीला स्थान द्यायला हवे’ पुणे : ‘महिला शायरांना संधी मिळाली तेव्हा त्यांची अनोखी शायरी जगासमोर आली. पुरुषसत्ताक सांस्कृतिक, सामाजिक दडपणांना झुगारून महिलांमधील शायरीच्या अभिव्यक्तीला समाजात स्थान मिळायला हवे,’ असे प्रतिपादन उर्दू शायरीचे आंतरराष्ट्रीय अभ्यासक कॅनडामधील डॉ. सय्यद तकी आबिदी यांनी केले.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language